Take a fresh look at your lifestyle.

राज्यात लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्री काय म्हणालेत पहा..


मुंबई :

राज्यात काही दिवसांपासून करोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारची काळजी वाढली आहे. राज्यावरील करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याने लॉकडाऊनच्या चर्चा सुरू आहेत. नागरिकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊनचा इशारा याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा लॉकडाऊनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री टोपे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Advertisement

“मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाउन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मुंबई लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याआधी राजेश टोपेंनी राज्यातील काही शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणे अटळ असेल तर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केले होते. राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

राज्यात सध्या करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यात रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंधांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे प्रशासनाकडून कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त राज्याच्या अन्य शहरात तसेच ग्रामीण भागातही रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply