Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : म्हणून ८०० जवानांची आत्महत्या; सरकारने दिली राज्यसभेत माहिती

दिल्ली :

Advertisement

देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना मिळणारा कमी पगार आणि भत्ते हा अनेकदा चर्चेत आलेला विषय आहे. मात्र, तरीही त्यावर ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यातच आता जवानांचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठीच्या आव्हानही किती मोठे आहे, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याला निमित्त ठरले आहे ते राज्यसभेत दिलेल्या माहितीचे.

Advertisement

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेली माहिती अनेकांना चिंतेत टाकणारी आहे. मागील सात वर्षात लष्कर, नौदल आणि वायूदलातील ८०० जवानांनी आत्महत्या केली आहे. या काळात ‘फेट्रिसाईड’चे २० प्रकरणेही घडली आहेत.

Advertisement

एकूण १४ लाख जवान आणि कर्मचारी सशस्त्र दलात काम करताना देशाच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून देशसेवा करीत आहेत. त्यांच्या आत्महत्येची ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सशस्त्र दलातील जवानांच्या आत्महत्या रोखणे व त्यांचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे.

Advertisement

२०१४ नंतर लष्करातील ५९१ जवानांनी आत्महत्या केली आहे. तर, भारतीय हवाई दलातील १६० जवान आणि नौदलातील ३६ जवानांनी आत्महत्या केली असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. वर्दीतले १०० जवान दरवर्षी आत्महत्येचा मार्ग निवडतात. सीमेवर असणारा तणाव, सैनिकांची मानसिक आणि शारिरीक स्थिती या गोष्टी यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. सुट्टी न मिळाल्याने अनेक दिवस घरी जाऊ न शकल्याने त्यांच्या तणावात वाढ होते. तसेच वैवाहिक समस्या आणि कुटुंबातील संपत्तीचे वाद यामुळेही जवानांना मानसिकदृष्ट्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply