Take a fresh look at your lifestyle.

करोनाचा उद्रेक; फ्रान्सपाठोपाठ ‘तिथेही’ केलाय लॉकडाउन..!

जगभरामध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने निर्बंध आधिक कठोर केले जात आहेत. करोनाने युरोपात थैमान घातले असून येथील देश पुन्हा लॉकडाऊनच्या मार्गाने चालू लागले आहेत. या विषाणूस प्रतिबंध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये कडक लॉकडाउन घोषित करण्यात आला. त्यानंतर आता जर्मनीने देखील असाच निर्णय घेतला आहे. जर्मनीनेही याच पद्धतीने निर्णय घेत पाच दिवसांचे कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाउनची घोषणा केल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिले आहे.

Advertisement

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केसल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान देशात लॉकडाउन करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या मोठ्या सामन्यांच्या आयोजनावरही १८ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पाच दिवसांच्या या लॉकडाउनदरम्यान देशातील जवळजवळ सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. भाज्या आणि अन्नधान्यांची दुकानं तीन एप्रिल रोजी एका दिवसासाठी उघडण्याची परवानगी देण्यात आली.

Advertisement

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीस काही काळ करोनाच्या रुग्ण संख्या कमी होत होती. त्यामुळे दिलासा  मिळाला होता. परंतु, मार्च महिन्यात मात्र रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. आता तर मागील वर्षाच्या तुलनेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुतांश देशांनी लसीकरण सुरू केल्यानंतरही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लादण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Advertisement

युरोपातही या आजाराचे रुग्ण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता जर्मनीने देखील याच पद्धतीने निर्णय घेतला आहे. या निर्बंधांच्या मदतीने करोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. युरोप प्रमाणेच जगाच्या अन्य देशांतही रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. संबंधित देशही या आजारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. भारतातही या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे राज्य सरकारांकडून निर्बंध आधिक कठोर करण्यात येत आहेत.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply