Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल तर ‘या’ आजारांपासून खूप लांब राहाल..!

तांब्याच्या भांड्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का? बहुतेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. उन्हाळ्यात वाढत्या गर्मीपासून संरक्षण मिळणे व शरीर थंड ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. यामध्ये इतर धातूपेक्षा तांब्याचे भांडे अतिशय श्रेष्ठ मानले जाते. पूर्वी प्राचीन संकृतीत तांब्याच्या भांड्यात जेवण व पाणी दिले जायचे. तांब्याच्या भांड्यामुळे अनेक आजार बरे होतात. याशिवाय अजूनही काही फायदे आहेत.

Advertisement

तांब्याच्या भांड्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शुद्ध मानले जाते. यामुळे रोग पसरविणाऱ्या जीवाणूपासून संरक्षण होते. या पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कावीळ आदि आजार पसरवणाऱ्या जीवाणूपासून संरक्षण मिळते.

Advertisement

कॅन्सरची सुरवात रोखण्यास तांबे फायदेशीर असते. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. यामुळे कॅन्सर पेशंटच्या त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीराला सूज वात येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आराम मिळतो.

Advertisement

कायम सर्दी होत असेल तर आशा वेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी रोज सकाळी प्यायल्यास सर्दी बरी होते. पोटाच्या वेगवेगळ्या आजरापासून संरक्षण होते. रोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी व बद्धकोष्ठता या सारखे प्रोब्लेम येणार नाहीत.

Advertisement

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे त्वचेवरील बर्याच समस्या कमी होतात. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि या संबधीत समस्या कमी होतात. त्वचा साफ व तेजस्वी होण्यास मदत होते. शरीराअंतर्गत साफ करण्यासाठी म्हणजे यकृत व किडनी साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर करावा.

Advertisement

तांब्याच्या भांड्याच्या बाबतीत कायम काळजी घेतली पाहिजे. भांडे कायम स्वच्छ ठेवले पहिले. ते रोज त्यावर येणारा थर याकडे लक्ष दिले पाहिजे. भांड्याची स्वच्छता नियमित करायला पाहिजे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply