Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : वाझे यांच्याकडील डायरीही जप्त; तपासाला मिळाली ‘तीही’ दिशा..!

मुंबई :

Advertisement

अँटिलिया स्फोट केसचा तपास रोज नवनवे गुपित खुले करीत आहे. आता NIA टीमला आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडील एक डायरी सापडली आहे. त्यात अनेक आर्थिक खुलासे असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

तंत्रज्ञान क्षेत्रात माहीर असलेले वाझे आपल्या सिक्रेट गोष्टींचा ऑनलाईन रेकॉर्ड ठेवत नव्हते, तर डायरीत नोंद करून ठेवायचे. हीच सिक्रेट डायरी आता तपासाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहे. त्या डायरीमध्ये अनेकांच्या आर्थिक हितसंबंधांबाबत माहिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

डायरीमध्ये आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. यातील जास्त व्यवहार हे कॅश ट्रान्स्फरचे  असल्याचे समजते. दरम्यान, कॉन्स्टेबल विनायक शिंदेच्या घरातील एक प्रिंटर जप्त केले आहे. याच प्रिंटरमधून स्कॉर्पिओ गाडीतून मिळालेले धमकीचे पत्र प्रिंट केल्याचा राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

Advertisement

‘प्रिय नीता भाभी और मुकेश भैया और परिवार, यह सिर्फ एक ट्रेलर है। अगली बार, आपके परिवार के पास उड़ान भरने के लिए पर्याप्त सामान होगा। सावधान रहें।’ असे त्या पत्रात म्हटलेले होते. त्याचाच पुढे तपास करताना यात मुंबई पोलिसांची टीम असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे अवघ्या देशभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply