Take a fresh look at your lifestyle.

आजच्या सामन्यावेळी वन डे संघात ‘या’ खेळाडूंना मिळू शकते पहिल्यांदाच संधी..!

पुणे :

Advertisement

टी २० मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीनंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची मालिका खेळणार असून या मालिकेतील पहिला सामना आज २३ मार्च रोजी पुणे येथे खेळला जाणार आहे. 

Advertisement

यावेळी भारताच्या एकदिवसीय संघात क्रुणाल पंड्या, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराज यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवची कामगिरी टी -२० मालिकेत खूपच प्रभावी होती, तर क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी विजय हजारे स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

Advertisement

पहिल्या एकदिवसीय सामन्यात या तीनपैकी कोणत्याही दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते आणि सूर्यकुमार आणि क्रुणाल या शर्यतीत पुढे दिसत आहेत. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार टी -२० मध्ये उत्तम कामगिरी करणारा सूर्यकुमार इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्याचा सर्वात मजबूत दावेदार आहे. सूर्यकुमारची कामगिरी विजय हजारे स्पर्धेतही प्रभावी होती आणि त्याने ५ सामन्यांत ६६.४० च्या सरासरीने ३३२ धावा केल्या आहेत.

Advertisement

क्रुणाल पांड्या देखील घरगुती क्रिकेटमधील अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असून त्याने ५  सामन्यांत १२९.३३ च्या सरासरीने ३८८  धावा केल्या आहेत. फलंदाजीबरोबरच क्रुणाल गोलंदाजीत देखील प्रभावी ठरला आहे. प्रसिद्ध कृष्णाने विजय हजारे स्पर्धेत ७  सामन्यांत एकूण १४  बळी मिळवले आहेत.

Advertisement

दरम्यान, एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने या मालिकेत संघात समाविष्ट असलेल्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले होते. तो म्हणाला होता,  ‘हे खूपच मनोरंजक असेल, कारण संघात असे काही तरुण खेळाडू आहेत ज्यांना वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच संधी मिळाली आहे. त्यामुळे ते एखाद्या मजबूत संघाविरूद्ध आपले कौशल्य कसे वापरतात हे पाहण्याची मला खूप उत्सुकता आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply