Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य सल्ला : उन्हाळ्यात ‘ही’ काळजी अवश्य घ्या; कारण मुद्दा आहे आनंदी जगण्याचा

मार्च महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेस कडाक्याचे उन पडत असल्याने तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्मा वाढला की काही आजार डोके वर काढतात. अशा वेळी व्यायाम, योग्य आहार आणि काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

Advertisement

साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात, जंतुसंसर्ग – डायरिया, डिसेंट्री, कावीळ, टायफॉईड असे आजार होतात. लहान मुलांमध्ये जंतूसंसर्ग, गोवर, कांजण्याचे प्रमाण दिसते. कंजक्टिव्हायटीस हा डोळ्यांचा आजारही या काळात होण्याची शक्यता असते.

Advertisement

कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमान वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात आरोग्य विभागाकडून सुद्धा विशेष काळजी घेण्यात येते. सरकारी दवाखान्यात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात येतो. या कक्षात कुलर तसेच खिडक्यांना वाळ्याचे पडदे बसवून वातावरण थंड ठेवले जाते. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना येथे ठेवले जाते.

Advertisement

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी पेशंटला थंड वातावरणात ठेवावे. अशा पेशंटनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या पेशंटला घरात एकटे सोडू नये. थंड पाण्याचा वापर करावा, लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे, उन्हात घराबाहेर पडू टाळावे.

आहार काय असावा
उन्हाळ्याच्या दिवसात भूक कमी लागते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात योग्य आहार घेण्याची आवश्यकता आहे. पचायला हलका व कमी आहार घ्यावा. पचायला जड, तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. आहारात सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे यांसारखी फळे खावीत. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं.

Advertisement

त्वचेचीही घ्या काळजी
उन्हाळ्यातील किरणांमुळे त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्वचा काळसर होते. त्यामुळे घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल तसेच अंग झाकून ठेवावं. कपडे सैल असतील याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना आयुर्वेदिक सनस्कीन लोशन लावावे. त्वचा कोरडी व निस्तेज होते. उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा.

Advertisement

सुती, मुलायम तसेच सौम्य रंगाचे कपडे घालावेत. पायात घट्ट बूट वापरणे टाळावे. त्वचा कोरडी पडू नये म्हणून उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाणी प्यावे. तसेच फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध प्रकारच्या फळांचे रस तसेच आहारात काकडीचं प्रमाण वाढवावं. याव्यतिरिक्त उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच अतिसाराचाही त्रास होण्याची भीती असते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply