Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियासाठी आहे ‘ही’ नामी संधी; पहा काय करावे लागेल त्यासाठी


पुणे :

कसोटी आणि टी २० मालिकेत इंग्लंडच्या संघाचा पराभव केल्यानंतर आता लवकरच वन डे मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता भारतीय संघाची दावेदारी मजबूत दिसत आहे. याव्यतिरिक्त भारतापुढे आणखी एक नामी संधी चालून आली आहे.

Advertisement

टीम इंडियास आयसीसी क्रमवारीत नंबर एकवर पोहोचता येणार आहे. यासाठी वन डे मालिका ३-० अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. भारतीय संघाने जर हे शक्य केले तर सध्या भारतीय संघ नंबर एक होईल. कसोटी आणि टी-२० मालिकेत पिछाडीवर असताना शानदार कमबॅक करत भारतीय संघाने विजय मिळवला. आता भारतीय संघासमोरचे आव्हान ५० षटकांच्या वनडे सामन्याचे असेल.

Advertisement

याआधी कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर होता. त्यानंतर ही मालिका भारताने ३-१ने जिंकली. नंतर टी-२० मालिकेत भारत २-१ने पिछाडीवर होता. तेव्हा देखील अखेरच्या दोन लढती जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकला. आता वनडे मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. आयसीसी क्रमवारीत सध्या इंग्लंड संघ १२३ गुणांसह आघाडीवर आहे. तर भारत आणि न्युझीलैंड ११७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जर भारताने वनडे मालिका ३-०ने जिंकली तर त्यांचे १२० गुण होतील आणि ते क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचतील. तर इंग्लंड ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.

Advertisement

दरम्यान, २०१० नंतर भारताने मायदेशात फक्त ३ द्विपक्षीय वनडे मालिका गमावल्या आहेत, २०१७ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात अखेरची लढत झाली. तेव्हा भारताने ३५१ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता, इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगने सर्वाधिक ४ शतक केली आहेत. दोन्ही संघातील कोणत्याही फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक शतक आहेत. ३ शतकासह विराट आणि जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत सध्या तरी भारताचे पारडे जड दिसत आहे. 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply