Take a fresh look at your lifestyle.

पशुधनाची काळजी घ्या; ‘त्या’ रोगामुळे दगावत आहेत दुग्धोत्पादक जनावरे

औरंगाबाद :

Advertisement

उन्हाची काहिली वाढत असतानाच नवनवे आजार आणि रोग प्रतिवर्षी येतात. जनावरे आणि पोल्ट्रीतील या नव्या किंवा साथीच्या आजारांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. आताही औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद आणि परिसरात जनावरांमध्ये एक रोग आलेला असून त्यामुळे दुग्धोत्पादक जनावरे मृत्युच्या घटना घडत आहेत.

Advertisement

 या रोगाने दररोज हजारो रुपयांचे दुभती जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. जनावरांना तत्काळ उपचारांची सोय उपलब्ध करून द्यावी व हलगर्जीपणा करणाऱ्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement

सावखेडा येथील अशोक सांडू नाके यांच्या पुन्हा एका ६० हजार रुपये किमतीच्या गाभण गायीचा रविवारी मृत्यू झाला आहे. या गाईसह त्यांच्या दोन गाई दगावल्याचे अशोक नाके यांनी सांगितले आहे.

Advertisement

याप्रकरणी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेऊन आहे. मात्र, त्यांनाही या आजाराचे नेमके निदान अजूनही झालेले नाही. यामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक झटका सहन करावा लागला आहे.

Advertisement

नावरांच्या उपचारापोटी पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी सर्रास पैसे घेत आहेत. जनावर तपासणीचे ७०० रुपये व ३०० रुपये शवविच्छेदनाचे व एका बैलाचे १५०० रुपये पशुधन पर्यवेक्षक विजय इटवले यांनी घेतल्याचे शेतकरी कणके यांनी या वेळी सभापती व इतर अधिकाऱ्यांना सांगितले. पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांना आतापर्यंत ५००० रुपये देऊनही माझी तीन जनावरे दगावल्याचे शेतकरी शालू सखाराम कणके यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply