Take a fresh look at your lifestyle.

वणव्याचे चटके; देशातील ‘या’ भागाला बसली सर्वाधिक झळ..!

दिल्ली :
कडाक्याच्या उन्हाळ्यात जंगलांमध्ये वणवा पेटण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यामध्ये हजारो लाखो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट तर होतेच शिवाय वन्य प्राण्यांनाही नाहक प्राणास मुकावे लागते. आता तर ग्लोबल वार्मिंगसारख्या नव्या समस्याही समोर आहेत.

Advertisement

याचाही विपरीत परिणाम निसर्गावर होत आहे. देशभरात जंगलांना आग लागण्याच्या घटना घडत असतात. मागील नोव्हेंबर २०२० ते मार्च या काळात ओदिशा या राज्यात सर्वाधिक ३ हजार ३३४ घटना घडल्या. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वाढत्या वणव्यांमुळे जंगले मात्र होरपळत आहेत.

Advertisement

 महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २०२० ते मार्च या कालावधीत १,९०४ वणवे लागल्याच्या नोंदी आहेत. ओदिशा ३,३३४ नोंदींसह पहिल्या, तर मध्य प्रदेश १,९३३ नोंदींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याच्या अखत्यारितील भारतीय वनसर्वेक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रत्येक मिनिटाला जंगलाला लागणाऱ्या आगीचा आलेख वाढलेला दिसत आहे.

Advertisement

याच संकेतस्थळावरील ‘मॉडीस’ या संगणक प्रणालीनुसार अवघ्या साडेतीन महिन्यांत वणव्याच्या नोंदीत देशात ओदिशा पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. वन वणव्यांचे नियंत्रण करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जातात. यासाठी सरकारकडून निधीही दिला जातो. तरी देखील वणव्यांची आकडेवारी पाहिल्यास वणवे रोखण्यात प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वणवा पेटतो. या व्यतिरिक्त अन्य काही कारणांचा सुद्धा शोध घेऊन त्यानुसार उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच वनवणवे नियंत्रित करण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद, आग प्रतिबंधक अत्याधुनिक संसाधने आणि स्थानिक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता संसाधने उपलब्ध करुन देणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

Advertisement

दरम्यान, आताही कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या काळात वनवे रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यावर भर द्यावा लागणार आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply