Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो, ‘या’ गोष्टीवर सरकारने लावलाय ३०० टक्के कर..!


दिल्ली :

देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमतीने आता शंभरी गाठली आहे. त्याखालोखाल डिझेल सुद्धा महाग होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे इंधनाचे दर खूप जास्त आहेत. मग, आपल्याकडेच पेट्रोल आणि डिझेल महाग का विकले जाते, असा प्रश्न नागरिकांना पडत असतो.

Advertisement

या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जात आहे. असे असताना दुसरीकडे गेल्या सहा वर्षांच्या काळात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर गेल्या सहा वर्षांच्या काळात तब्बल ३०० टक्क्यांहून आधिक कर लावण्यात आल्याची माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे.

Advertisement

गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर 300 टक्क्याहून अधिक कर लावण्यात आल्याची कबुली माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत दिली. या संबंधिच्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकुर म्हणाले की, “मोदी सरकार सत्तेत यायच्या आधी २०१४-१५ सालच्या दरम्यान पेट्रोलच्या उत्पादन शुल्कातून २९ हजार २७९ कोटी रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातून ४२ हजार ८८१ कोटी रुपये कमावण्यात आले आहेत.

Advertisement

मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्य सुरुवातीच्या काळात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील करात वाढ करण्यात आली होती. मागील फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. आता मार्च किमती काही प्रमाणात स्थिर होत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ३२.९८ प्रति लिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. याव्यतिरिक्त राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply