Take a fresh look at your lifestyle.

ग्राहकांना येणार ‘अच्छे दिन’; डाळीच्या आयातीबाबत झालाय ‘हा’ महत्वाचा निर्णय..!

पुणे :

Advertisement

शेतकऱ्यांच्या शेतमालास जास्त भाव मिळणार नाही, आणि भाव नियंत्रणात राहतील याची मोठी कसरत केंद्र सरकारला वेळोवेळी करावी लागते. त्यासाठी निर्यातबंदी किंवा आयात करणे याचे रामबाण इलाज त्यांच्याकडे असतात. आताही पुढील वर्षासाठी डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आयातीचा कोटा जाहीर झाला आहे.

Advertisement

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी तूर आणि मुगाच्या आयातीचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे बाजारात या दोन्ही डाळीचे भाव नियंत्रणात राहतील असे केंद्र सरकारला वाटत आहे.

Advertisement

४ लाख टन तूर आणि १.५ लाख टन मुगाची आयात करण्यासह मोझांबिकसोबत सरकारच्या कराराअंतर्गत २ लाख टन तूर आयात केली जाणार आहे. तत्पूर्वी ४ लाख टन उडीद आयातीचा कोटा सरकारने आधीच जारी केला आहे. त्यामुळे या वित्त वर्षादरम्यान तूर, मूग आणि उडदाची एकूण आयात ११.५ लाख टनांपर्यंत जाणार आहे.

Advertisement

ऑल इंडिया दाल मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी याबाबत दैनिक भास्कर आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांना माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी याबाबत म्हटले आहे की, कडधान्याच्या आयातीमुळे देशात उपलब्धता वाढेल आणि किमतींवर नियंत्रण राहील. मात्र, तरीही ग्राहकांना स्वस्त डाळ मिळण्याबाबत अनिश्चितता कायम राहील. व्यापारी आपला नफा पाहून साठा करतात. अशावेळी मिलकडे कडधान्याची उपलब्धता घटू शकते. 

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply