Take a fresh look at your lifestyle.

चीन सरकार उचलणार ‘ते’ही पाउल; पहा ‘अलिबाबा’सह कोणाला बसणार फटका..!

दिल्ली :

Advertisement

एकपक्षीय हुकुमशाही असलेल्या चीन देशात सरकार कोणत्याही पद्धतीने दमनाची यंत्रणा राबवू शकते. याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. आता चीनचे उद्योगपती जॅक मा आणि त्यंाची कंपनी अलिबाबा व अँट ग्रुप यांच्यासह अनेकांना याचा मोठा झटका सहन करावा लागणार आहे.

Advertisement

चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुतोवाच केले आहे की, ज्या ऑनलाईन कंपन्यांनी डेटा आणि मार्केटच्या शक्तीवर ताबा मिळवला आहे. अशा प्लॅटफॉर्म कंपन्यांविरुद्ध आणखी कठोर भूमिका घेतली जाणार आहे.

Advertisement

चिनी कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ वित्तीय सल्लागार आणि समन्वय समितीसोबतच्या बैठकीत शी जिनपिंग यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच अन्य कंपन्यांवरही होऊ शकते, असेच याद्वारे सरकारने सूचित केले आहे.

Advertisement

नियामकांना इंटरनेट कंपन्यांची निगराणी करणे आणि एकाधिकाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश चीनी सरकारने दिले आहेत. प्लॅटफाॅर्म इकॉनॉमी म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म कंपनी यावरच हा हातोडा पडणार आहे.

Advertisement

मोबाइल आणि इंटरनेट कंपन्यांसाठी प्लॅटफॉर्म कंपनी असा शब्दप्रयोग आहे.  कॅब सर्व्हिसपासून फूड डिलिव्हरी, ई-कॉमर्स, डिजिटल व्यवहार प्लॅटफॉर्मपर्यंतची सेवा या कंपन्या देतात. कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या कोट्यवधीत आणि व्यापार अब्जावधी डॉलरचा असतो.

Advertisement

बाजारात निरोगी स्पर्धेेला चालना दिली जावी आणि अवैध भांडवल विस्तार रोखला जावा. सीसीटीव्हीनुसार, काही प्लॅटफॉर्म कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर केला आहे आणि यामुळे जोखीम आणखी वाढली आहे, असे जीनिपिंग यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply