Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’मुळे भाजपने लावली अविश्वास ठरावाची फिल्डिंग; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आहे भर

मुंबई :

Advertisement

सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आणि भ्रष्टाचार असल्याच्या मुद्द्यावर रान उठवण्यात अखेर भाजपला यश मिळाले आहे. त्यानुसार या सर्व मुद्द्यांना एकत्रित करून आगामी पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या विरोधात थेट अविश्वास आणण्याची तयारी भाजपने केली आहे.

Advertisement

दिव्य मराठी या वृत्तपत्राने ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, परमबीरसिंगांच्या याचिकेतून सीबीआय तपासणीची मागणी, किरीट सोमय्यांच्या पत्रातून ईडी, आयकर विभागाच्या धाडी आणि अखेरीस दोन महिन्यांनी येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव या दिशेने भारतीय जनता पक्षाची महाविकास आघाडी सरकारविरोधातील रणनीती असल्याचे कळते.

Advertisement

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्यात अस्थिरता निर्माण होऊन सत्ताबदल होतो की नाही याकडे आता देशाचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परबांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तलवार परजली आहे. परब हे केवळ गृह खातेच नाही तर गृहनिर्माण खात्यातही “हस्तक्षेप’ करीत असल्याचा आरोप सोमय्या यांनी नाशिकमध्ये केलेला आहे.

Advertisement

सोमय्या यांनी म्हटले आहे की, २ मार्च रोजी एका एसआयएच्या प्रकरणात सकाळी काढलेला आदेश कोणाच्या हस्तक्षेपाने दुपारी साडेतीन वाजता बदलण्यात आला आणि त्यातील ६०० कोटी कोणी लंपास केले?

Advertisement

दरम्यान, वाझे प्रकरण, मनसुख हत्या आणि परमबीरसिंगांच्या तक्रारीमुळे गृहमंंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. आता त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानात उतरला आहे. राज्यपालांनी मुख्यमंंत्र्यांकडून अहवाल मागवून राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंंटीवार यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ  

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply