Take a fresh look at your lifestyle.

सरकार बरखास्तीची मागणी करताना अॅड. आंबेडकरांनी ठाकरेंवर केला ‘तोही’ आरोप

मुंबई :

Advertisement

राज्यात सध्या राजकीयदृष्ट्या अस्थिर वातावरण निर्माण होते की काय असेच चित्र आहे. त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मनसुख हिरेन प्रकरण असो वा देशमुख प्रकरण या दाेन्हीची निष्पक्ष चौकशी राज्य सरकारकडून होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे. मात्र, विधानसभा बरखास्त करू नये.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणी मुख्यमंत्र्यांना कणा नसल्याचे पुन्हा दिसले आहे. देशमुख प्रकरणात राज्यपाल यांनी आपला अहवाल राष्ट्रपतींना पाठवावा अन्यथा राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत तो पक्षसुद्धा या प्रकरणात सामील असल्याचा जनतेचा समज होईल.

Advertisement

अॅड.आंबेडकर यांनी सोमवारी दुपारी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्याचवेळी देशमुख प्रकरणात विरोधी पक्ष असलेला भाजपा बोटचेपी भूमिका घेत असल्याची टिका आंबेडकर यांनी केली आहे.

Advertisement

एकूणच मुंबई पोलिसांच्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर चहूबाजूंनी आरोप होत आहेत. भाजपने याप्रकरणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply