Take a fresh look at your lifestyle.

7/12 उताऱ्यात सरकारने केलेले ‘हे’ 10 बदल जाणून घ्या; अन्यथा येईल पश्चातापाची वेळ


जागेच्या सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने महत्वाचे बदल केलेले आहेत. हे बदल प्रत्येकाने जाणून घ्यावेत असेच आहेत. हे बदल करण्याचा निर्णय सरकारने २ सप्टेंबर २०२० रोजी घेतला.

Advertisement

सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-७ मध्ये कोणाच्या नावावर किती जमीन आहे, याचा उल्लेख असतो तर गाव नमुना -१२ मध्ये या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केलेली आहे, याची माहिती नोंदवलेली असते. या गाव नमुना-७ व गाव नमुना -१२ अशा दोन्हीला मिळून सातबारा असं म्हटलं जातं.

Advertisement

सरकारने या सातबारा उताऱ्यात अनेक महत्वाचे बदल केलेले आहेत. या बदलांमुळे जनतेला माहितीपूर्ण सातबारा उतारा मिळणार असून, राज्यात सर्वत्र एकाच प्रकारचा सातबारा आता मिळणार आहे.

Advertisement


असे आहेत महत्वाचे बदल

Advertisement


१) गाव नमुना -७ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक टाकण्यात येणार आहे.
२) लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराबा क्षेत्र नवीन उताऱ्यात स्वतंत्र दर्शविण्यात येणार आहे़ तसेच या दोघांची बेरीज करुन एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे.

Advertisement

३) शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर हे एकक तर बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार आहे.
४) पूर्वी खाते क्रमांक इतर हक्क या रकान्यात नमूद केलेला असे़ नवीन उताऱ्यात खाते क्रमांक खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.

Advertisement


५) पूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करुन दाखवल्या जात. नवीन उताऱ्यात या नोंदी कंस करुन त्यावर एक आडवी रेष मारुन त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.
६) प्रलंबित फेरफार इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून नोंदवण्यात येणार आहेत.

Advertisement


७) गाव नमुना-७ मधील सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन उताऱ्यात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात नोंदविण्यात येणार आहेत.
८) खातेदारांची नावे स्पष्टपणे दिसावीत यासाठी दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेष काढण्यात येणार आहे.

Advertisement


९) गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार आणि त्याची तारीख ही माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायात नोंदविण्यात येणार आहेत.
१०) बिनशेती सातबारा उताऱ्यावरील पोट खराबा, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत. तसेच सर्वात शेवटी ‘हे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना क्रमांक-१२ ची आवश्यकता नाही’, अशी सुचना असणार आहे. 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply