मुंबई :
नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्येत सातत्याने वाढत गेली, तर काही शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे स्पष्टपणे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमिवर टोपे यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जे लक्षणविरहीत रुग्ण आहेत, त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. शिवाय सोसायटीतील सदस्यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे.
संस्थात्मक विलणीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. पुढील तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले आहे की, राज्यात दररोज सरासरी 3 प्रमाणे आतापर्यंत 45 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढणे, ही चिंतेची बाब आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि लॉकडाउन लावायचा का, लावला तर कुठे लावायचा, याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही टोपे यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण, घाबरण्याचे कारण नाही, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी