Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘त्या’ भारतीय लेगस्पिनरने रिलीज केला चित्रपटाचा टीझरही..!

मुंबई :

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल मागील वर्षी २२ डिसेंबरला नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्माशी विवाहबंधनात अडकला होता. या जोडप्याचे गुरुग्राममध्ये लग्न झाले. चहल आणि धनश्रीने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना शेअर केली. यानंतर या जोडप्याने मेहंदी, संगीत आणि हळदी विधीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. आता या जोडप्याने त्यांच्या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Advertisement

वास्तविक, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवरून त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी आपल्या लग्नाच्या या व्हिडिओला टीझर असे नाव दिले आहे. या टीझरमध्ये चहल आणि धनश्रीची मेहंदी, हळदी, संगीत आणि लग्नाची छायाचित्रे आणि काही छोट्या क्लिप्सही आहेत. हा टीझर खूपच लोकप्रिय होत असून त्यात चहल आणि धनश्रीची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisement

हा टीझर शेअर करताना युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे की लग्नाचा चित्रपट या महिन्याच्या २७ तारखेला प्रदर्शित होईल. आपल्या टीझर पोस्टच्या कॅप्शनमध्ये चहलने लिहिले की, तु माझी आहेस, मी तुझा आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. शनिवारी २७ मार्च रोजी हा विवाह चित्रपट प्रदर्शित होईल. नुकतीच या जोडप्याने मालदीवमध्ये सुट्टीच्या वेळी सोशल मीडियावर बरीच छायाचित्रे पोस्ट केली होती. ते फोटो लोकांना चांगलेच आवडले होते.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply