Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इंडिया लेजेंड्सने तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पटकावले वर्ल्ड सिरीजचे जेतेपद

मुंबई :

Advertisement

शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या शानदार फायनलमध्ये इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लेजेंड्सला १४ धावांनी पराभूत केले आणि रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी २० या स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना इंडिया लेजेंड्सने श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावांवर रोखले. श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान (२१) आणि सनथ जयसूर्या ( ४३) यांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६२ धावांची शानदार भागीदारी करत दमदार सुरुवात केली.

Advertisement

दिलशान-जयसूर्याची फलंदाजी डोकेदुखीची ठरत असतानाच युसुफ पठाणने दिलशानला बाद केले. दिलशानने १८ चेंडूत ३ चौकार ठोकले. युसूफनंतर इरफान पठाणने चामारा सिल्वाला (२)  पहिल्याच षटकात एस. बद्रीनाथच्या हाथी झेलबाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

Advertisement

पठाण ब्रदर्सच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ९१ धावांवर ४ गडी गमावले होते. यूसुफने जयसूर्याला पायचित केले आणि इरफानने उपुल थरंगाला १३ धावांवर बाद केले. जयसूर्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. यानंतर चिंताका जस्सिंगे (४०) आणि कौशल्य वीरातने (३८) यांनी ५ व्या विकेटसाठी ६४ धावांची खेळी केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला आणि भारताने सामना जिंकून विजेतेपद १४ धावांनी जिंकले.

Advertisement

प्रथम फलंदाजीस आलेल्या इंडिया लेजेंड्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिले २ बळी फक्त ३५ धावांमध्ये गमावल्यानंतर सचिन तेंडुलकरही ३० धावा करून बाद झाला. त्यानंतर युसूफ पठाण आणि युवराज सिंग यांच्यात ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी टीम इंडियासाठी फायदेशीर ठरली. अशाप्रकारे भारताने निर्धारित २० षटकात १८१ धावा केल्या.

Advertisement

युसुफ पठाणने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याला युवराज सिंगने चांगली साथ दिली. त्याने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६० धावांचे योगदान दिले. अष्टपैलू कामगिरीबद्दल युसूफला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply