Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ निर्यातीत राज्याची आघाडी; पहा किती टन होणार आहे निर्यात..!

मुंबई :

साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. साखर उत्पादनाबरोबरच आता राज्याने निर्यातीतही आघाडी घेतली आहे. देशभरातून निर्यात होणाऱ्या साखरेपैकी जवळपास निम्मी साखर राज्यातून निर्यात होणार आहे.

Advertisement

देशभरातून ४४ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले असून यातील २० लाख टन साखर निर्यात करार राज्यातील आहेत. विशेष म्हणजे साखर निर्यात धोरण उशीरा जाहीर होऊनही निर्यात करार मात्र वेगाने होत आहेत.

Advertisement


 या वेळी साखर निर्यात धोरण जाहीर होण्यास उशीर झाला. त्यामुळे निर्यात करारांनाही उशीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. परदेशातून साखरेस मागणी कायम राहिल्याने देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीस प्राधान्य दिले.

Advertisement

या योजनेत केंद्र सरकारने काही महत्वाचे बदल केले. या बदलांचाही फायदा कारखन्यांना मिळाला आहे. निर्यात कोटे अदलाबदल सवलतीचा उपयोग करून देशातून ६ लाख ३२ हजार टनांचे निर्यात करार झाले. यापैकी एकट्या महाराष्ट्रातून ५ लाख टनांचे करार झाले आहेत.

Advertisement

केंद्राने निर्यात धोरण जाहीर करताना एकूण साठ लाख टन साखरेचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ४४ लाख टन साखरेचे करार मार्च मध्यापर्यंत झाले आहेत. या पैकी २० लाख टन साखरेचे करार महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, राज्यात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे साखर निर्यातीस वाव असतो. निर्यातीसाठी कारखान्यांकडूनही प्रयत्न करण्यात येतात. यावेळी केंद्र सरकारने साखर निर्यातीचे जे उद्दीष्ट निश्चित केले आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यात राज्याचा सहभाग सर्वाधिक दिसत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply