Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. वणव्यानंतर आता पूर..! पहा कोणता भाग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होरपळतोय..!


मागील वर्षी जंगलातील वणव्यांनी पुरते होरपळून निघाल्यानंतर आता नव्या वर्षात भयंकर पुराचे संकट ऑस्ट्रेलियावर ओढवले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साऊथवेल्स् या राज्याला पुराचा तडाखा बसला आहे. प्रचंड पावसामुळे पूरस्थिती आणखी बिघडत चालली असल्याने लाखो नागरिकांना घरे सोडून अन्यत्र आसरा घ्यावा लागला आहे.

Advertisement

पुढचे काही दिवस पाऊस असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. प्रशासन, पोलिसांनी पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु केले असून शेकडो लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहे.

Advertisement

मागील २०२० या वर्षात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. या वर्षाच्या सुरुवातीलाच करोना विषाणूने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली. आता या आजारावर लसी उपलब्ध असल्या तरी धोका टळलेला नाही. एकीकडे जगतील बहुतांश देशात लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे याच काळात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

Advertisement

नव्या वर्षातही या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियातील जंगलांत वणवा पेटला. या वणव्यात लाखो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली. तसेच कोट्यवधी प्राण्यांना जीव गमवावा लागला. या संकटातून बाहेर पडल्यानंतर या देशासमोर पुराचे संकट उभे ठाकले आहे. न्यू साऊथवेल्स या राज्याला पुराचा तडाखा बसला आहे. तसेच सिडनी या शहरात पुराचे पाणी आले आहे. नागरिकांनी पूर भागात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Advertisement

सिडनी शहराला पाणी पुरवठा करणारे बार्गाम्बा धरणाची पाणी पातळी रेकॉर्ड स्तरावर गेली आहे. २०१६ नंतर प्रथमच हे धरण भरून वाहू लागले आहे. गुरुवारपर्यंत पावसापासून काहीही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याने पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply