Take a fresh look at your lifestyle.

‘देशमुखांनी पवारांना तर धमकी दिली नाही ना..’; मुनगंटीवार यांनी उपस्थित केली गंभीर शंका

मुंबई :

Advertisement

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ‘देशमुखांनी पवारांना तर धमकी दिली नाही ना..’ असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, रविवारी शरद पवार आधी म्हणाले की, अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. रात्री म्हणाले राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना?

Advertisement

पोलीस महासंचालक दर्जाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याने या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी भाजपने केली आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणासंदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही.

Advertisement

सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत अहवाल मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींना पाठवावा. मागणीबाबत भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply