Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा ‘त्यांनी’ केला दावा; पहा नेमके काय म्हटलेय

मुंबई :

Advertisement

सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस, अशी जहरी टीका काँग्रेस नेते राजू वाघमारे यांनी केली आहे.

Advertisement

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर अडचणीत आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्ण ताकद उभी केली आहे. त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर करत पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

फडणवीस यांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या ट्विटवर राजू वाघमारे यांनी म्हटले आहे की, 15 फेब्रुवारीला प्रेस झाली परंतु हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. भाजप नेते कृपा करून तपासून घ्या.

Advertisement

Dr. Raju waghmare on Twitter: “15 फेब्रु.प्रेस झाली परंतु हास्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा!सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व भाजप नेते कृपा करून तपासून घ्या @NANA_PATOLE @AnilDeshmukhNCP @TV9Marathi @ani” / Twitter

Advertisement

दरम्यान, 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली मग ते क्वारंनटाईन कसे असा सवाल फडणवीस यांनी केला होता. यावरून आता काँग्रेसने फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Advertisement

देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण, असा थेट प्रश्न फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply