Take a fresh look at your lifestyle.

म्हणून गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता; पहा काय आहे हवामान खात्याचा अंदाज

अहमदनगर :

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेमोसमी पाऊस होत आहे. काही भागात गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे. त्यामुळे साधारण गुरुवारपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement


दरम्यान, या अवकाळी पावसाचा नगर जिल्ह्यासही फटका बसला आहे. जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे पिकांचे नुकसान मात्र होत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. यामुळे उकाडा वाढला असला तरी कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

Advertisement

येत्या दोन ते तीन दिवसात सुद्धा राज्यातील हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघर्गजनेसह अवकाळी पाऊस होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील विदर्भ व परिसर आणि मध्यप्रदेश या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

Advertisement

तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

Advertisement

या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस होत असल्याने पिकांसाठी नुकसानदायक ठरत आहे. नगर जिल्ह्यातही दोन दिवसांपासून पाऊस होत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply