Take a fresh look at your lifestyle.

‘या’ पाच स्कूटर्सची आहे बाजारात धूम; पहा कोणत्या आहेत ‘त्या’ स्कूटर्स

मुंबई :

सध्याच्या वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यात मानवी जीवन गतिमान बनले आहे. त्यामुळे जगभरात वाहनांची संख्या वाढली आहे. प्रत्येकालाच वाहनांची गरज भासू  लागली आहे. त्यामुळे आता तर अगदी गाव खेड्यांतही दुचाकी चारचाकी वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. ही गोष्ट हेरुन वाहन कंपन्याही नवीन वाहने बाजारात आणत आहेत.

Advertisement

गेल्या काही वर्षांत वाहनांचा वापर वाढला आहे. रोजच नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकी वाहनांचा वापर वाढला आहे. देशभरात या वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. फेब्रुवारी महिन्यात किती दुचाकी स्कूटर्स विकल्या गेल्या याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

फेब्रुवारी २०२१ मध्ये माहितीनुसार होंडा अॅक्टिव्हा सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर बनली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या स्कूटरची २ लाख ०९ हजार ३८९ युनिट्सची विक्री झाली आहे. या स्कूटरला भारतात जास्त मागणी आहे.

Advertisement

त्यानंतर टिव्हीएस स्कूटरचा नंबर आहे. या स्कूटरलाही देशात मागणी आहे. सन २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये य स्कूटरची विक्री खूप जास्त राहिली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या स्कूटरची ५२ हजार १८९ युनिट्सची विक्री झाली आहे.

Advertisement


होंडा अॅक्टिव्हा प्रमाणेच देशभरात सुझुकी अॅक्सेस या स्कूटरला चांगली मागणी आहे. देशातील नागरिक मोठ्या संख्येने या स्कूटरची खरेदी करतात. ही स्कूटर सेलमध्ये तिसऱ्या नंबर वर आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या स्कूटरची ४८ हजार ४९६ युनिट्सची विक्री झाली आहे. तर फेब्रुवारी २०२० मध्ये याची विक्री ५० हजार १०३ युनिट सेल झाली आहे.

Advertisement


यानंतर होंडा कंपनीची डिओ स्कूटर आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या स्कूटरची २६ हजार ४९४ युनिट्सची विक्री झाली आहे.

Advertisement

हिरो कंपनाची प्लेजर स्कूटर पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात ८ हजार ४३५ स्कूटर विक्री झाली होती. यावेळी फेब्रुवारी २०२१ मध्ये मात्र तब्बल २३ हजार १०६ स्कूटर विकल्या गेल्या आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply