दिल्ली :
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत कायमच वाद होत असतात. या मुद्द्यावर दोन्ही देश एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. त्यामुळे या मुद्द्यावर हे दोन्ही एकत्र येणे अशक्यच. मात्र तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कट्टर वैरी देश दहशतवादाविरोधात एकत्रित सराव करणार आहेत. यात चीनदेखील त्यांच्या सोबतीला असणार आहे.
सध्या चीन आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. चीनच्या कारवायांमुळे भारत दुखावला गेला आहे. तरी देखील दहशतावादाच्या मुद्द्यावर या देशांनी एकत्र येण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.
भारत, पाकिस्तान आणि चीन एकत्रित सराव करणार आहे. या तीन देशांसह शांघाई सहकार्य परिषद संघटनेतील (एसईओ) सदस्य देशही या सरावात सहभागी होणार आहेत. हा सराव ‘पब्बी-अॅण्टी टेरर-२०२१’ या नावाने होणार असून दहशतवादी कारवायांविरोधात असणार आहे.
ताश्कंदमध्ये १८ मार्च रोजी क्षेत्रीय दहशतवादविरोधी परिषदेची (आरएटीएस) ३६ वी बैठक पार पडली. एससीओतील सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी दहशतवाद, फुटीरतावादाविरोधात लढण्यासाठी २०२२-२४ मधील कार्यक्रमाच्या मसुद्याला मंजुरी दिली. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे. दहशतवादी कारवायांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा स्रोत ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एससीओ सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिन्हुआच्या वृत्तानुसार, भारत, कझाकिस्तान, चीन, किर्गीज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आदी देशांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
दहशतवादा विरोधात एकत्रित सराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आशिया खंडातील भारत, पाकिस्तान आणि चीन हे देश दहशतवादा विरोधात सराव करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत चीन आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी मजबूत होत आहेत. तर दुसरीकडे या दोन्ही देशांचे भारता बरोबर शत्रूता वाढत आहे. पाकिस्तान तर सुरुवातीपासूनच भारता विरोधात कारवाया करत असतोच. आता यामध्ये चीनची भर पडली आहे. काही महिन्यांपासून चीन आणि भारतामध्ये वाद वाढला आहे.
संपादन : मुकुंद भालेराव
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- बाब्बो.. सेवांच्या नावाखाली गरिबांच्या खिशात हात; पहा बँकांनी कसे लुटलेय आपल्याला..!
- शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा
- शिक्षक-विद्यार्थी सर्वेक्षणातून पुढे आले ‘हे’ 5 मुद्दे; दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी
- ‘त्यांच्या’सह अदानीही करणार ‘रिटेल क्रांती’; अमेझॉन, रिलायन्सपुढील आव्हाने वाढणार..!
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ