Take a fresh look at your lifestyle.

ऐकावं ते नवलंच की; म्हणून भारतापेक्षा पाकिस्तान, श्रीलंका जास्त हॅपी..!


भारत आणि पाकिस्तान या दोन सख्ख्या शेजारी देशांत कायमच तणाव असतो. आता तर या दोन्ही देशांतील संवाद पूर्णपणे ठप्प आहे. भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण असे म्हटले तर भारतीयांसमोर पाकिस्तानचे नाव समोर येते. असे असले तरी पाकिस्तानातील नागरिक मात्र भारतातील नागरिकांपेक्षा जास्त आनंदी असल्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आपला आणखी एक शेजारी देश श्रीलंका सुद्धा या क्षेत्रात भारताच्या एक पाऊल पुढे आहे.

Advertisement

जगभरात सध्या करोना महामारीचं संकट असतानाही सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली. यानुसार फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या यादीत एकूण १४९ देशांचा समावेश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे.

Advertisement

१४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी असल्याचे म्हटले आहे. चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या क्रमांकावर आहेत.

Advertisement

फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लेंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.
आशिया खंडातील देशांचा विचार केला तर भारत देश क्षेत्रफळाने मोठा देश आहे. देशाची लोकसंख्या मोठी आहे. चीन वगळता भारताच्या शेजारी असणारे अन्य देश लहान आहेत.

Advertisement

तसेच या देशांची लोकसंख्या सुद्धा खूप कमी आहे. जीडीपी तसेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही भारत या देशांच्य तुलनेत फार पुढे आहे. मात्र, देशातील नागरिकांचे आनंदी असण्यात मात्र भारत या देशांच्या मागे असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या यादीत दिसत आहे, हे देखील आश्चर्यच म्हणावे लागेल.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply