Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाला ११११ कोटींचा ‘न्याय’; पहा कोणती खास योजना झालीय लागू


दिल्ली :

केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात. या प्रमाणेच देशातील राज्य सरकारांकडूनही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान देण्यात येते. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेंतर्गत दरवर्षी देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांसाॉठी योजना सुरू करण्यात अन्य राज्ये देखील मागे नाहीत. निवडणूक काळात अनेक घोषणा केल्या जातात. त्यातील काही घोषणा प्रत्यक्षात येतात तर काही मात्र कागदावरच राहतात.

Advertisement


भाजपला पराभूत करुन राज्य काबिज करणाऱ्या छत्तीसगड काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन योजना सुरू केल्या. राजीव गांधी किसान न्याय योजना आणि गोधन योजना या दोन योजना सरकारने सुरू केल्या. या योजनांतर्गत बँक खात्यात जमा केले जात आहे. छत्तीसगड सरकारने राजीव गांधी किसान न्याय योजना आणि गोधन योजना अशा दोन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांतर्गत जवळपास ११११ कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आले आहेत.

Advertisement


राजीव गांधी किसान न्याय योजनेचा चौथा हप्ता म्हणून ११०४.२७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर गोधन न्याय योजनेंतर्गत पशुपालनासाठी ७.५५ कोटी रुपये जमा केले आहेत. या योजनेतील ठराविक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी किसान न्याय योजनेचा लाभ राज्यातील १८ लाख ४३ हजार शेतकरी घेत आहेत.

Advertisement

या योजनेतंर्गत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतंर्गत रविवारी चौथ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ११०४.२७ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply