Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ठकारे सरकारच्या अडचणीत वाढ; बापट, राणा यांनी घेरले लोकसभेत, पहा कोणी काय म्हटलेय

मुंबई :

Advertisement

द्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या चिंतेत भर टाकणारे ठरले आहे. दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केल्याने आता राज्य सरकारच्या अडचणी आणखी वाढली आहेत.

Advertisement

 परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याचा मुद्दा सध्या लोकसभेत चर्चेत आलेला आहे. याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी मुख्यामंत्र्यांना खंडणीच्या मुद्द्यावर घेरले आहे.

Advertisement

तर, सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभेत शिवसेना आणि भाजपा खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. भाजपा खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

Advertisement

एकूणच मुंबई पोलिसांच्या मुद्द्यावर सध्या राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Advertisement

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल, असे राणा यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply