Take a fresh look at your lifestyle.

नवनीत राणा यांनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप; थेट लोकसभेत त्यांनी मांडला ‘हा’ मुद्दा..!

मुंबई :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठकारे सरकारच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. बदली झालेल्या आयुक्तांचे पत्र चर्चेत असतानाच आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

नवनीत राणा या वेगवेगळ्या भूमिका घेऊन अनेकदा चर्चेत असतात. अनेकदा त्यांना यामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. आताही त्यांनी ठाकरे सरकारला अडचणीत आणणारी ‘ठोस’ भूमिका घेऊन लक्ष वेधले आहे. लोकसभेत त्यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

राणा यांनी म्हटले आहे की, माझे सहकारी महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचे काम सुरु आहे असे सांगत आहेत. जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले. जेव्हा भाजपाचे सरकार होते तेव्हाच उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, खंडणी वसुल करण्याचे असेच काम संपूर्ण देशातही होऊ शकते. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळे सुरु आहे. बदल्या, खंडणी वसुल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल असाही प्रश्न आहेच की..!

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply