Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भाजप कार्यकर्त्यांना होत नाही करोनाबाधा; पहा नेमका काय दावा केलाय नेत्यांनी..!

अहमदाबाद :

Advertisement

भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्या भूमिका आणि कारणे ही वेगळ्या पीएचडी संशोधनाचा भाग आहेत. आताही करोना होण्याच्या निमित्ताने गुजरातमधील भाजपा आमदाराने ‘खास’ माहिती जगजाहीर केली आहे.

Advertisement

राजकोट (दक्षिण) मतदारसंघाचे भाजपा आमदार असणाऱ्या गोविंद पटेल यांनी भाजप कार्यकर्त्यांना करोना न होण्याचे महत्वाचे रहस्य जगजाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही.

Advertisement

गेल्या महिन्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना, पक्ष संघटनेचे प्रमुख सी. आर. पाटील यांच्यासहीत सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना आणि भाजपाचे खासदार रंजनबेन भट्ट यांनीही शनिवारी कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तरीही पटेल यांनी हा अजब दावा केल्याने ते चर्चेत आहेत.

Advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी स्थानिक निवडणुका आणि अहमबादामध्ये कसोटी तसेच टी-२० मालिका आयोजित केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा फेटाळून लावताना म्हटले आहे की, क्रिकेटचे सामने केवळ अहमबादामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीला या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकाही झाल्या नाहीत आणि क्रिकेटचे सामनेही झाले नाहीत. मात्र देशामध्ये कोरोना संसर्गाची रोजची जी आकडेवारी समोर येत आहे.

Advertisement

एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा करोना हा आरोग्याचा कमी आणि राजकीय पक्षांच्या दृष्टीने राजकारणाचा महत्वाचा मुद्दा कसा बनला आहे हेच सिद्ध झालेले आहे. जे खूप मेहनत करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असाच दावा आमदार पटेल यांचा आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply