Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेततळे ठरतेय वरदान; जाणून घ्या शेततळ्यांचे महत्व..!


राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत शेत जमीनींना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे ध्येय आहे.

Advertisement

राज्यातील शेतीला सिंचन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. शेततळ्यांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. शेततळ्यांच्या माध्यमातून कमी खर्चात सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने सुरुवातीपासूनच या उपक्रमास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत शेततळ्यासाठी साधारण ५० हजार रुपये अनुदान राज्य सरकारमार्फत देण्यात येते. जिल्ह्यांना दरवर्षी ठराविक उद्दीष्ट देण्यात येते.

Advertisement

या योजनेत राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत, त्यानुसार शेतकरी किमान ०.६० हेक्टर शेतजमिनीचे मालक असतील, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच राज्यातील सर्व शेतकरी किंवा शेतकरी गट या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Advertisement

राज्यात शेततळ्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. या त्यानंतर आता शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठीही अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

पाण्याची बँक म्हणूनच अनेक शेतकरी याचा वापर करतात. मात्र, याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे आहेत. जसे की, शेततळे भरण्यासाठी थेट भूगर्भातील पाणीसाठा उपसून ते भरले जाते. मात्र, अशावेळी बरेच पाणी बाष्पीभवन होऊन निघून जाते. त्यामुळे शेततळे हा भूगर्भातील पाण्याचा वापर करणारे आणखी एक महत्वाचे कारक बनलेले आहे.

Advertisement

मात्र, एकूण ज्यांच्याकडे शेततळे आहेत त्यांना याचा खूप फायदा आहे हे निश्चित. मात्र, सर्वांनीच शेततळे केल्यावर मग काय करायचे, असाही प्रश्न आहेच की.. मात्र, तोपर्यंत आपणही शेततळे करून घ्या आणि आपली शेती फुलवा की..

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply