Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्री देशमुखांच्या अडचणीत भर; पहा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर सुरू झालीय चर्चा

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत असून कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात बदल होण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. अशावेळी मुंबईचे बदली झालेले आयुक्त परमवीर सिंग यांच्या पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Advertisement

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचा लक्षांक दिल्याच्या पत्राची क्तवसुली संचलनालय (ईडी) यांच्याकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

क्तवसुली संचलनालय (ईडी) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली संस्था आहे. राज्यात महाविकास आघाडी, तर केंद्रात भाजपची सत्ता आहे. अशावेळी केंद्र सरकारच्या या संस्थेकडून कधीही याप्रकरणी चौकशी सुरू झाल्यास गृहमंत्री देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

या आरोपांचे गांभीर्य समजून घेऊन ‘ईडीही’ स्वतःहून तपास करू शकते, अशा बातम्या आता येण्यास सुरुवात झालेली आहे. याप्रकरणी परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच याबाबत विरोधी पक्षाकडून तक्रार नोंदवली गेल्यासही ‘ईडी’कडून हे प्रकरण हाताळले जाऊ शकते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply