Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ 5 विदेशी खेळाडू पहिल्यांदाच गाजवणार आयपीएलचे मैदान; पहा काय आहे त्यांची स्ट्रेंथ

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील प्रथम क्रमांकाची क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. आयपीएलचा यंदाचा हंगाम ९ एप्रिलपासून सुरु होणार असून प्रत्येक हंगामात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. केवळ देशातीलच नाही तर परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहतात. जेव्हा आयपीएलचा लिलाव होतो, तेव्हा अनेख खेळाडूंना कोट्यावधी रुपयांमध्ये खरेदी केले जाते. दरवर्षी होणाऱ्या लिलावात बऱ्याचदा नवीन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते.

Advertisement

आयपीएल २०१२१ च्या लिलावात १ हजार ९७ खेळाडूंनी नावे दिली, त्यापैकी २९२ नावे शॉर्टलिस्ट केली गेली. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे झालेल्या लिलावात केवळ ५७ खेळाडूंची विक्री झाली. यावेळी लिलावात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. आज आम्ही तुम्हाला त्या परदेशी खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे प्रथमच आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.

Advertisement

१) काइल जेमीसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
आयपीएल २०२१ च्या लिलावात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनला १५ कोटी रुपयांची बोली लावली गेली. जेमीसनला खरेदी करण्यासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पहायला मिळाली. ६.६ फूट लांबीचा हा गोलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतला असून जॅमीसनने न्यूझीलंडकडून ६ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ३६, एकदिवसीय सामन्यात ३ तर टी २० मध्ये ४ बळी मिळवले आहेत.

२) डेव्हिड मालन (पंजाब किंग)
आयपीएल २०२१ च्या पदार्पणाच्या यादीत इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मालनचा देखील समावेश आहे. डेव्हिडला पंजाब किंग्जने त्याच्या दीड कोटी रुपयांच्या बेस प्राइससाठी खरेदी केले आहे. मालन सध्या टी २० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर मालनने २४ टी २० सामन्यात ४९.२१ च्या सरासरीने १ हजार धावा केल्या आहेत.

३) रिले मेरीडिथ (पंजाब किंग)
पहिल्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू रिले मेरीडिथसुद्धा खेळताना दिसणार आहे. पंजाब किंग्जने या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खरेदी करण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. मेरीडिथने ३४ घरगुती टी २० सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय बिग बॅश लीगमध्ये त्याने १६ बळी मिळवले आहेत.

Advertisement

४) झाय रिचर्डसन (पंजाब किंग)
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याचे नावही पहिल्यांदा आयपीएलच्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. झायला पंजाब किंग्जने १२ कोटींमध्ये खरेदी केले आहे. आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्दीत त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १२ बळी घेतले आहेत.

५) मार्को जॅन्सन (मुंबई इंडियन्स)
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जान्सन या २० वर्षाच्या वेगवान गोलंदाजास मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर विकत घेतले आहे. मार्कोने यापूर्वी २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघासह भारत भेट दिली होती. 

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply