Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शहराचे करोना मीटर सुस्साट; म्हणून घ्यावा लागला ‘हा’ निर्णय


पुणे

राज्यात करोना वेगाने फैलावत आहे. या घातक आजारास आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील पुणे आणि मुंबई या मोठ्या शहरांत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. पुण्यात तर मागील काही दिवसांपासून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

राज्यातील करोनाचे रोज वाढत जाणारे आकडे धडकी भरवणारे आहेत. रोज नवे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा ताण वाढला आहे. या आजारास आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध आधिक कठोर करण्यात येत आहेत. मात्र, तरी सुद्धा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहेत. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही करोना फैलावत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. या गतीने रुग्ण वाढत राहिल्यास आगामी काळात उपचारांच्या सुविधा कमी पडू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच ऑक्सिजनच्या खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे.

Advertisement

पुण्यात दररोज १५ हजार चाचण्या आणि २० हजार लसीकरण होत आहे. चाचणी आणि लसीकरणाचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, राज्याप्रमाणेच देशभरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य राज्यांतही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यावेळी मार्च महिन्यात रुग्ण संख्या वाढत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply