Take a fresh look at your lifestyle.

टी-२० मालिकेत भारताने केले ‘हे’ अनोखे विक्रम; वाचा महत्वाची माहिती
पाचव्या टी २० सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत केले. भारतासाठी विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि ८० धावांची खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या २२४ धावांवर नेण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Advertisement

२२५ धावांचे हे मोठे लक्ष्य इंग्लंडच्या संघाला काही गाठता आले नाही, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखत २० षटकांत ८ बाद १८८ धावसंख्या करु दिली. शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांनी महत्त्वपूर्ण प्रसंगी विकेट्स घेतल्याने भारताला हा शानदार विजय मिळवता आला. या विजयामुळे भारतीय संघाने मालिका जिंकली.

Advertisement

या मालिकेदरम्यान काही विक्रम नोंदवले गेले. विराट कोहली कर्णधार म्हणून टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फिंचचा विक्रम मोडला. कोहलीने कर्णधार म्हणून १ हजार ४६४ धावा करू शकला आहे. कर्णधार म्हणून फिंचने १ हजार ४६२ धावा केल्या आहेत. याशिवाय विराट टी २० आंतरराष्ट्रीयमध्ये कर्णधार म्हणून ५० पेक्षा जास्त वेळा धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने १२ वेळा हे कामगिरी केली आहे.

Advertisement

इंग्लंडविरुद्ध टी २० मालिका जिंकून भारताने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. सलग सहाव्यांदा टी -२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा चमत्कार भारताने केला आहे. टी २० क्रिकेटमध्ये भारतीय संघ अखेरच्या फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत पराभूत झाला होता. या मालिकेनंतर आतापर्यंत एकूण ६ टी २० आंतरराष्ट्रीय मालिका भारताने जिंकल्या आहेत.

Advertisement

इंग्लंडविरुद्ध टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या टी २० मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध २० षटकांत २ गडी गमावून २२४ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply