Take a fresh look at your lifestyle.

इंग्लंड मॅचमध्ये वापसी करत असतानाच कोहलीच्या ‘या’ निर्णयामुळे बदलले चित्र..!

मुंबई :
भारत आणि इंग्लंडविरुध्द काल टी २० चा पाचवा व अंतिम सामना खेळला गेला. यापुर्वी दोन्ही संघाने २ सामने जिंकत मालिकेत बरोबरी साधली असताना या सामन्याला अंतिम सामन्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत केले आणि ५ सामन्यांची टी २० मालिका ३-२ अशी जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत २ बाद २२४ धावांची मोठी धावसंख्या रचली आणि त्यानंतर इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावांवर रोखले.

Advertisement

इंग्लंडने २२५ धावांचा पाठलाग करत असताना १२.४ षटकांत ४ गडी बाद १३० धावा केल्या. जोस बटलर आणि डेव्हिड मालन यांचा खेळपट्टीवर चांगलाच जम बसला होता. येथून इंग्लंडला ४४ चेंडूत ९५ धावांची गरज होती. पण कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयाने संपूर्ण खेळाचे चित्र पालटले. भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला इंग्लंडच्या डावाच्या १३ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या हाती पाचव्या चेंडूवर झेलबाद केले. या विकेटने सामना भारताच्या बाजूने झुकला.

Advertisement

बटलरसारखा धोकादायक फलंदाज क्रीजवर असता तर इंग्लंडने हा सामना आणि मालिका जिंकली असती, परंतु विराट कोहलीने हे होवू दिले नाही. आपल्या कर्णधारपदाचे कौशल्य सादर करताना कोहलीने भुवनेश्वर कुमारला १३ व्या षटकात बॅटलरसमोर उभे करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी बरोबर असल्याचे सिद्ध झाले.

Advertisement

बटलर ३४ चेंडूत ५२ धावांवर बाद झाला. या वादळी खेळीत बटलरने ४ षटकार आणि २ चौकार लगावले होते. या सामन्याच्या आणि मालिकेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बटलरची विकेट निर्णायक ठरली. बटलर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या बाकीच्या फलंदाजांना सूर गवसलाच नाही, आणि त्यांची फलंदाजी कोसळली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ वर रोखले. आणि अशाप्रकारे, भारताने शेवटचा आणि निर्णायक टी २० सामना ३६ धावांनी जिंकत मालिका विजय मिळविला. भुवनेश्वर कुमारला ‘सामनावीर’चा किताब देण्यात आला. कुमारने ४ षटकांत १५ धावा देऊन २ गडी बाद केले.

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply