Take a fresh look at your lifestyle.

मार्चअखेर पुन्हा बँकांना सुट्ट्या; नियोजन करा न कामे लवकर आटोपा, नाहीतर..

मुंबई :

मार्च महिना अखेरीस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा बँकेच्या संबंधित कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे. याआधी मागील आठवड्यातील दोन दिवस तसेच सोमवार व मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प होते. या काळात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

Advertisement

यानंतर आता पुन्हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. बँकांच्या आर्थिक वर्षातील कामकाजाच्या दृष्टीने मार्च महिना महत्वाचा असतो. त्यातच होळीची सुट्टी आणि चौथा शनिवार असल्याने केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. त्यामुळे या दोन दिवसात नागरिकांना बँकांची कामे करावी लागणार आहेत, नाहीतर ३ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. तर महिनाअखेर सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहे. २७ मार्च रोजी चौथा शनिवार आणि २९ मार्च रोजी सोमवारी धुलिवंदनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका २७ मार्च, २८ मार्च आणि २९ मार्च अशा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँका थेट ३० मार्च रोजी उघडणार आहेत.

Advertisement

३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा हिशेब असल्याने बँकांची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असेल. गुरुवारी १ एप्रिल रोजी बँका नेहमी प्रमाणे सुरू राहतील. तर २ एप्रिल रोजी पुन्हा बँकांचे कामकाज बंद राहील. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने बँका बंद असतील. ३ एप्रिल रोजी शनिवारी बँका नेहमी प्रमाणे सुरू राहणार आहेत.  

Advertisement

खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी १५ आणि १६ मार्च असा दोन दिवसीय संप केला होता. या संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाल्याने दोन दिवस सरकारी बँकांची सेवा कोलमडली होती. बँकांचे कामकाज ठप्प पडले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या काळात डिजीटल बँकिंगवर भर देण्यात आला.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply