Take a fresh look at your lifestyle.

सोन्याबाबतचा ‘हा’ नियम आम्हीत आहे का तुम्हाला; वाचा, कारण त्याचे आहे खूपच महत्व

मुंबई :

Advertisement

सोन्याची शुद्धता नेमकी किती आहे, याबाबतचे कोडे ग्राहकांना असते. त्यामुळेच ग्राहकांच्या समाधानासह सोन्याच्या खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी सोन्याबाबत ठोस आणि कार्यक्षम नियम 1 जूनपासून देशभरात लागू होत आहेत.

Advertisement

यापुढेही सोन्याची शुद्धता आता तीन दर्जांमध्ये असणार आहे. 22 कॅरेट, दुसरे 18 कॅरेट आणि तिसरे 14 कॅरेट सोने असे शुद्धतेचे प्रकार असतील. या दर्जाबद्दल या दोघांच्याही मनात शंका राहणार नाही अशी नियमावली लागू होणार आहे. कारण, 1 जून 2021 पासून हॉलमार्क नसलेल्या सोन्याची विक्री करता येणार नाही.

Advertisement

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच बीआयएसने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सोन्यासाठी हॉलमार्किंग सध्या हॉलमार्क अनिवार्य नाही. मात्र, 15 जानेवारी 2021 पासून असे हॉलमार्किंग करूनच सोने विकण्याचे निर्देश होते. मात्र, सराफ संघटनेच्या मागणीवरून ही वाढवून 1 जून 2021 करण्यात आलेली आहे.

Advertisement

सराफांसाठी बीआयएसमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया बरीच सोपी करण्यात आली आहे. आता हे काम घर बसल्या ऑनलाईन करण्यासाठी http://www.manakonline.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. येथे मागितलेली सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर नोंदणीशुल्क भरून लगोलग नोंदणी करणे शक्य आहे.

Advertisement

बीआएसचे नोंदणीचे शुल्कही कमी आहे. सराफाची उलाढाल 5 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याच्यासाठी हे शुल्क 7500 रुपये आहे. तर, 5 कोटी ते 25 कोटीदरम्यान वार्षिक उलाढाल असल्यास 15 हजार रुपये आणि 25 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असल्यास हे शुल्क 40 हजार रुपये आहे. एखाद्या सराफाची उलाढाल 100 कोटींपेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी हे शुल्क 80 हजार रुपये लागणार आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply