Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाला या खेळाडूमुळे सामोरे जावे लागले होते लाजिरवाण्या पराभवाला..!

मुंबई :

Advertisement

सन २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा सामना बांग्लादेशविरुद्ध होता आणि या सामन्याचा हिरो होता तो १७ वर्षांचा तमिम इक़्बाल. या पराभवाचा झटका इतका जबरदस्त होता की श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे मनोबल ढासळले आणि भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. भारत आपला सामना बांगलादेशविरुद्ध हारेल अशी कोणीच कल्पना देखील केली नव्हती. मात्र ही किमया साधली गेली ती तामिममुळे.  

Advertisement

सन २००७ मध्ये तमिमने पदार्पण केले. याच वर्षी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात तमिमने तुफान फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेन येथील मैदानावर हा सामना खेळला गेला होता. बांगलादेशने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला होता. भारताच्या त्या पराभवाचा खलनायक आणि बांगलादेशच्या विजयाचा नायक होता डावखुरा फलंदाज तमीम. आज दि.२० मार्च तमीमचा वाढदिवस आहे. बांगलादेशच्या चितगांव येथे जन्मलेल्या तमिमने आपल्या विस्फोटक खेळीनी अनेकदा चाहत्यांची मने जिंकली. भारताविरुद्धाची त्याची ही खेळी अशीच अविस्मरणीय होती.

Advertisement

तमिमने आपल्या १४  वर्षांच्या कारकीर्दीत अशी विशेष कामगिरी केली, जे महान फलंदाज सचिन तेंडुलकरसुद्धा 24 वर्षांच्या कारकीर्दीत साध्य करू शकला नाही. तमिमने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी शतक झळकावले,  जे सचिन कधीही करू शकला नाही. गेल्या १४  वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला येत तमिमने बांगलादेशचा सर्वात यशस्वी फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३  हजाराहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तमिमचे नाव बांगलादेशसाठी प्रथम १० हजार,  ११  हजार,  १२  हजार आणि १३ हजार धावा करणाऱ्या यादीत आहे.

Advertisement

संकलन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply