Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अचानक कोहली गेला मैदानाबाहेर..!

मुंबई :

Advertisement

सध्या भारत आणि इंग्लंड दरम्यान टी २० मालिका सुरु असून पाच सामन्यांच्या या मालिकेत आज शनिवारी अखेरचा सामना विजेता ठरवणार आहे. या मालिकेत भारत आणि इंग्लंड या दोघांनी दोन सामने जिंकले असून आता पाचव्या सामन्याला फायनल सामन्यासारखे महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अचानक मैदानाबाहेर गेला होता. आता याचे कारण समोर आले आहे. 

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी -20 सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या रोमांचक लढतीमध्ये इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. यासह, टी -२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यादरम्यान एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सामना सुरु असतानाच कोहली मैदानाबाहेर गेला. इंग्लंडच्या डावाची १६ षटके संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेर गेला,  त्यानंतर रोहित शर्माने बाकी ४  षटकांत टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले. कोहलीने असे का केले याबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले.

Advertisement

याचे कारण कोहलीने स्पष्ट केले असून कोहली म्हणाला, ‘मी एका बॉलच्या मागे धावत होतो,  मी डाय मारला आणि चेंडू फेकला. त्यावेळी मी योग्य स्थितीत नव्हतो. माझ्या शरीराचे तापमान खूप वेगाने कमी होत होते. अशा स्थितीत आपले शरीर कठोर होऊ लागते. यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते आणि मला दुखापत होऊ द्यायची नव्हती. मी आता ठीक आहे आणि पुढील सामना खेळण्यास तयार आहे. मला असे वाटते की मैदानावरुन परत येणे हा एक स्मार्ट निर्णय होता, कारण आमचा पुढील सामना खूप महत्वाचा आहे, असे तो म्हणाला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply