Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’प्रकरणी मुश्रीफांनी देशाची माफी मागावी; भातखळकर यांनी केली मागणी

मुंबई :

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दलचा मुद्दा भाजपने उचलला आहे. हसन मुश्रीफ फाउंडेशनने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी प्रश्नपत्रिकेत केलेल्या एका चुकीवर बोट ठेऊन भाजपने हा मुद्दा लावून धरला आहे.

Advertisement


शिवराज्याभिषेक दिनाला ‘स्वराज्य दिन’ असे नामकरण करून त्यातून जाणीवपूर्वक ‘शिव’ हा शब्द वगळणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावे चालणाऱ्या कागल येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी प्रश्नपत्रिकेत देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्वाची शिकवण संपूर्ण देशाला देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी पद्धतीने करून देशातील तमाम जनतेच्या मनातील महापुरुषांचा अवमान केला आहे, हे केवळ संतापजनक नसून निषेधार्थ सुद्धा आहे, त्यामुळे हसन मुश्रीफांनी ही प्रश्नपत्रिका तात्काळ मागे घेऊन संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करत, 24 तासांच्या आत ही प्रश्नपत्रिका मागे न घेतल्यास या विरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सतत अशा प्रकारची हिंदू विरोधी व समाजात तेढ निर्माण करणारी व महापुरुषांचा अपमान करणारी कामे करण्याचा सपाटा लावला आहे. दारूची दुकाने बार, मॉल, हे सर्व सुरू असताना सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ केली, मंदिरांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले, केवळ हिंदू उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले, आषाढी वारी करिता दिलेल्या बसचे भाडे आकारण्यात आले, हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या व भडकाऊ भाषण देणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कडक निर्बंध लादण्यात आले, इतक्यावर हे सरकार थांबले नसून आता महापुरुषांचा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस सुद्धा या महाविकास सरकार मधील नेत्यांमध्ये आले असून आता राज्यातील जनताच यांचा हा माज उतरल्याशिवाय राहणार नाही, असे सुद्धा आ. अतुल भातखळकर म्हणाले.

Advertisement

संपादान : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply