Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल सर्च’वर ‘त्या’ चुका अजिबात करू नका; पहा नेमका काय बसेल झटक्यात फटका..!

Google वर काहीही शोधणे आपल्या सवयीचा भाग बनला आहे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास, जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर, जर एखाद्याला बँकेच्या ग्राहक सेवेशी बोलायचं असेल तर करा गुगल सर्च.. असेच आपण सध्या करतो की नाही?

Advertisement

पण गुगल सर्चच्या या सवयीमुळे आपणास बर्‍याच गोष्टीसाठी मनस्ताप होऊ शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे वास्तव आहे. आजार असाध्य नसल्यास आणि तिथे सर्च करताना काही चूक झाल्यास आपली आजीवन कमाई काही सेकंदातच आपण संपवू शकतो.

Advertisement

आज आपण आठ गोष्टींबद्दल माहिती घेणात आहोत. या अशा गोष्टी आहेत ज्या Google वर शोधू नये. कारण आपण त्या शोधून फसवणूक होण्याची शक्यता 99 टक्के अधिक आहे.

Advertisement

जेव्हा एखाद्या कंपनीत किंवा बँकेत समस्या उद्भवतात तेव्हा आपण प्रथम Google वरच ग्राहक सेवा क्रमांकावर शोधतो. परंतु असे बर्‍याचदा घडले आहे की, Google वरून काढलेला ग्राहक सेवा क्रमांक वापरल्याने अनेकांना लाखोंचा चुना लागला आहे.

Advertisement

गुगलवर ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध घेण्यापूर्वी तुम्ही खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शोध घेतल्यानंतर दिसणार्‍या नंबरवर चुकूनही लगेच कॉल करु नका. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया हँडलवरून ग्राहक सेवा क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

Google वर आपल्या बँकेची वेबसाइट शोधतानाही खूप सावधगिरी बाळगा. यूआरएलचे बारकाईने परीक्षण करा. कारण सायबर ठग बँकेच्या नावासारख्या वेबसाइटद्वारे लोकांना फसवण्याचे युक्ती वापरतात. बरेचदा लोक त्यांच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवेबद्दल गूगल शोधतात आणि जाळ्यात फसतात.

Advertisement

आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, Google वर औषध शोधण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचे सेवन करण्यास सुरवात करा. औषध आणि रोगाबद्दल माहितीसाठी गूगल वापरणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. Google वर नमूद केलेले कोणतेही औषध चुकून घेऊ नका. अगोदर त्याची खात्री करा.

Advertisement

आपल्याला एका सेकंदात Google वर वजन कमी करण्याच्या लाखो टिप्स मिळतील. परंतु, या टिप्स नवीन रोगही देऊ शकतात. आरोग्याशी संबंधित कोणत्याही विषयाबद्दल आहारतज्ञाशी संपर्क साधा किंवा डॉक्टरांना भेटा.

Advertisement

लोक बर्‍याचदा गूगलवर गुंतवणूकीसाठी आणि शेअर बाजाराच्या टिप्स घेण्यासाठी जातात. शेअर बाजाराविषयी आणि गुगलवर गुंतवणूकीबद्दल दिलेली माहिती तुमची फसवणूक करण्यासाठी असू शकते किंवा काही सायबर ठगांनी टिप्स दिल्या असतील तर त्यांच्या जाळ्यात आपण अडकू शकता.

Advertisement

गूगल सर्चमधील सर्वाधिक फसवणूक बोगस बँक आणि बोगस सरकारी वेबसाईटविषयी आहे. केवळ पासपोर्ट सेवेबद्दल बोलताना आपल्याला Google वर बर्‍याच बनावट वेबसाइट सापडतील. कोणत्याही सरकारी वेबसाइटची यूआरएल बारकाईने तपासा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

Advertisement

लोक बर्‍याचदा गूगलवर डिस्काउंट कूपन आणि ऑफर शोधत असतात. डिस्काउंट कूपनच्या नावावर बनावट फॉर्म अनेकदा लोक भरले जातात आणि त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती घेतली जाते. याशिवाय कूपन देण्याच्या नावाखाली लोक त्यांच्या फोनमध्ये संशयास्पद अ‍ॅप्स डाउनलोड करतात आणि फसतात.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply