Take a fresh look at your lifestyle.

वाझे प्रकरणात ट्विस्ट; ‘त्याच’ ठिकाणी सापडला आणखी एक मृतदेह..!

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकेयुक्त कार ठेवण्याच्या प्रकरणाचा तपास चालू आहे. यामध्ये दररोज नवीन माहिती पुढे येत आहे. त्यातच आता आणखी एका घटनेने मुंबई हादरली आहे. कारण, ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडला आहे.

Advertisement

महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह 48 वर्षीय शेख सलीम अब्दुल यांचा आहे. ते मुंब्राच्या रेती बंदर येथील रहिवासी आहेत. अँटिलीयाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आणि त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची अटक आणि आता मनसुख यांचा मृतदेह जिथे सापडला तिथे आणखी एक मृतदेह सापडल्याकडे राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारीही (एनआयए) लक्ष ठेऊन आहेत.

Advertisement

दिवंगत मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ स्फोटकांनी भरून देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभी होती. या प्रकरणानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह मुंबईला लागून असलेल्या मुंब्राच्या आखाती भागात सापडला होता. या प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आरोप केला होता.

Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या डायटॉम्सच्या तपासणीचा अहवाल एटीएसला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये हे निदर्शनास आणले गेले आहे की, मनसुख हिरेन पाण्यात टाकण्यापूर्वीच जिवंत होते. शीव हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. राजेश डेरे यांच्या म्हणण्यानुसार, या चाचणी अहवालात सबळ पुरावे म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. याद्वारे फ़क़्त दुवे जोडले जाऊ शकतात.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply