औरंगाबाद :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप झाला आहे. आज रात्रीही फोनाफोनी प्रचार होईल. मात्र, उड्या यासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यात भाजपला विजय मिळतो की कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीला यश मिळते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मार्च राेजी हाेणार अाहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळी ८ वाजता निवडणूक प्रचार संपला आहे. रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत संचालकांच्या १८ जागांसाठी मतदान हाेईल, तर २२ मार्च रोजी अदालत रोडवरील बँकेच्या कार्यालयात मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
भाजपचे अामदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीला जोरदार आव्हान दिले आहे.
कोरोनाबाधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दुपारी ३.३० ते ४.०० असा अर्धा तास राखीव ठेवण्यात आला आहे. अशा मतदारांनी पीपीई किट, फेसशील्ड, हँडग्लाेव्हज तर इतर मतदारांनी मास्क लावून येणे सक्तीचे असेल.
बँकेच्या बिगरशेती (पतसंस्था) मतदारसंघातून अनिल अंबादास पाटील हे निवडणूक लढवत अाहेत. अापल्याला वडिलांकडून सहकार क्षेत्रातील बाळकडू मिळाले अाहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर करू, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बिगरशेती मतदारसंघातील उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी म्हटले आहे की, शेतकरी, मजूर, शेतीवर आधारित व्यावसायिकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने सहकाराची निर्मिती झाली अाहे. यात पक्षीय राजकारण अाणणे चुकीचे अाहे. अाैरंगाबाद जिल्हा बँकेत तेच लाेक वर्षानुवर्षे सत्तेवर येत अाहेत. विराेधक निर्माणही हाेऊ देत नाहीत, सामान्य शेतकऱ्यांचा अावाज दाबला जाताे. मात्र अाता प्रस्थापितांचे वर्चस्व माेडून काढून जुने चित्र बदलण्यात येईल.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!