औरंगाबाद :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उज्ज्वला कनेक्शन याेजनेंतर्गत घरोघरी एलपीजी गॅस वाटप केले. मात्र, आता सध्या गॅस टाकीचे भाव गगनाला भिडल्यावर तो गॅस परवडत नसल्याने महिलांना पुन्हा एकदा चुलीचाच आधार वाटत असल्याचे वास्तव आहे.
या वास्तवाला वाचा फोडण्याचे काम दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राने केले आहे. औरंगाबाद जिल्यातील अजिंठा येथील वार्ताहर रितेश गुप्ता यांनी याबाबत विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. ते वृत्त आहे उज्ज्वला कनेक्शन याेजनेंतर्गत ८ कोटीवे गॅस कनेक्शन देण्यात आलेल्या अजिंठ्याच्या शेख आयेशा शेख रफिक यांचे.
अजिंठ्याच्या शेख आयेशा शेख रफिक यांना ७ सप्टेंबर २०१९ राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्ज्वला कनेक्शन देण्यात आलेले होते. मात्र, आता सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने आयेशा यांना चुलीचाच आधार घ्यावा लागत आहे.
गॅसचा भाव ८३२ वर गेल्याने मजुरी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेख आयेशा यांना गॅस भरण्यासाठी पैसे नसल्याचे वास्तव आहे. गॅस सिलिंडरची दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. आता गॅस सिलिंडर जवळपास ८३२ पर्यंत गेला. मात्र, सबसिडी फक्त ३ रुपये २६ पैसेच येत आहेत. याकडेही बातमीत लक्ष वेधले आहे.
संपादन : सचिन पाटील
- आयपीएल २०२१ : गोविंदाच्या जावयाची तुफानी खेळी; शाहरुखच्या केकेआरकडून घालतोय धुमाकूळ
- आयपीएल २०२१ : सेहवाग म्हणतो हैदराबादच्या पराभवासाठी ‘हा’ खेळाडू जबाबदार..!
- महत्वाची आठवण : लाराने आजच्या दिवशीच ‘त्यांच्या’विरोधात ठोकल्या होत्या विश्वविक्रमी ४०० धावा..!
- जेव्हा केकेआरच्या ‘त्या’ खेळाडूची पत्नी राशिदला म्हणाली ‘मॅच आम्ही जिंकणार’; वाचा भन्नाट किस्सा
- पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कोहलीला बाबरकडून ‘ही’ गोष्ट शिकण्याचा दिला सल्ला