Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या ‘त्या’ मोठ्या शहरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन; पहा काय आहेत नियम

मुंबई :

Advertisement

नागपुर शहरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता वाढवून थेट 31 मार्चपर्यंत करण्यात आलेला आहे. पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राउत यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या दिवसाला 20 हजार लोकांचं लसीकरण केलं जातं. ते 40 हजारावर नेण्याचे लक्ष्य आहे. हरात कठोर निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे.

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीनंतर 31 मार्चपर्यंत कठोर निर्णय लागू राहणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.

Advertisement

(1) Dr. Nitin Raut on Twitter: “कोव्हिड नियंत्रण संदर्भात नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे मा. खासदार, मा. आमदार, मा. महापौर, मा.अध्यक्ष जिल्हा परिषद (नागपूर) तसेच मा.@Dev_Fadnavis यांचे समवेत आज एकत्रित आढावा बैठक घेतली. यानंतर नागपुरातील लोकडॉऊन 31 मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. @InfoNagpur https://t.co/RRsZc6iW91” / Twitter

Advertisement

याबाबतचे निय असे :

Advertisement
  1. भाजीपाल्याची विक्री 4 वाजेपर्यंत सुरु राहणार
  2. बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार
  3. शाळा पूर्णपणे बंद राहतील
  4. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही
  5. सर्व परीक्षा कोरोना नियमांचे पालन करुन होतील
  6. बाजारपेठा बंद, फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच दुकाने सुरु राहतील

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply