Take a fresh look at your lifestyle.

मंगळवारच्या ‘त्या’ मुद्द्यावर भडकले ओवेसी; पहा ‘शुक्रवार’बाबत काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

राजकारणात जनतेच्या मुद्द्यांना कमी महत्व देताना भावनिकदृष्ट्या मतदारांना आकर्षित करण्याची कला अवगत असावी लागते. सगळ्याच पक्षाच्या भारतीय राजकारण्यांना ती अवगत आहे. कारण, नेत्यांची ती गरज आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा मंगळवार आणि शुक्रवार या दोन ‘महत्वाच्या’ मुद्द्यांनी दिला आहे.

Advertisement

हरियाणा राज्यातील गुरुग्राममध्ये दर मंगळवारी मांस-मटन व मांसाहारी पदार्थ विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतरांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात काय केले आहे, त्यामुळे एखाद्याच्या मनाला दुखापत कशी होईल असा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

Advertisement

(1) Asaduddin Owaisi on Twitter: “How can beliefs get hurt by what other people are doing in their private lives? People are buying, selling or eating meat, they’re not forcing you to partake By this logic, close alcohol shops on Friday? Meat is food for millions of Indians. Cannot treat it as something impure” / Twitter

Advertisement

ओवेसी म्हणाले की, त्या आधारे शुक्रवारी दारूची दुकानेही बंद करावीत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) याचे प्रमुख ओवेसी यांनी ट्वीट केले आहे की, ‘इतर लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही करत आहेत. त्यामुळे एखाद्याच्या मनाला दुखापत कशी होईल? लोक मांस विक्री करतात किंवा खातात. ते आपल्याला कोणालाही असे खाण्यास भाग पाडत नाहीत. याच आधारे मग शुक्रवारीही दारूची दुकाने बंद करायची का? कोट्यावधी भारतीय मांस खात आहेत. हे वाईट आहे असे समजू नका.

Advertisement

मंगळवारी गुरुग्राममध्ये मांस दुकाने बंद करण्याशी संबंधित बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीचा फोटो शेअर करून ओवेसी यांनी हे म्हटले आहे. गुरुवारी गुरुग्राम महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे की, मटणाची दुकाने दर मंगळवारी बंद ठेवण्यात येतील. आठवड्यातून एक दिवस ही दुकाने बंद ठेवण्याच्या सूचनेची नोंद घेऊन ही कार्यवाही झाल्याचे समजते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Advertisement

Leave a Reply