Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले ‘हे’; पहा काय असेल सरकारचे धोरण

मुंबई :

Advertisement

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे. युरोपात फ्रान्सच्या 16 शहरांमध्ये पुन्हा एकदा महिनाभराची टाळेबंदी लागू झालेली असतानाच महाराष्ट्र राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नेमके काय होऊ शकते यावर मुख्यामंत्र्यांनी भूमिका मांडली आहे.

Advertisement

जगभरात सध्या करोना वायरसचा संसर्ग वेगाने होत आहे. गेल्या काही दिवसांपासून  भारतातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातही रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारही काळजीत आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णाची नोंद घेण्यात आली. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी परिस्थिती दिसत आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

Advertisement

“राज्यात करोनाचा धोका वाढला आहे पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र अजूनही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरत  आहेत,” असे त्यांनी नंदुरबार येथे प्रसारमाध्यमांना सांगितले.

Advertisement

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना वेगाने फैलावत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी घेण्यात आली.

Advertisement

गुरुवारी एकाच दिवसात राज्यात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. देशात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत  आहेत तर दुसरीकडे लसीकरणही सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान समोर असून, तीन-चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासानाला दिले आहेत. राज्यात जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Advertisement

Leave a Reply