Take a fresh look at your lifestyle.

करोनाचा धसका; राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, काळजीपूर्वक वाचा

मुंबई :

Advertisement

देशासह राज्यात करोना वायरस वेगाने वाढत आहे. त्यामुळे या विषाणूस रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड बाबत नव्याने आदेश जारी करण्यात आले असून त्यात अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत.

Advertisement

राज्यात करोनाचा धोका वाढत चालला आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याआधी सरकारने हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध होते. त्यानंतर आज सरकारने नव्याने नियमावली जारी करत खासगी कार्यालयांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Advertisement

राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

नाट्यगृहे व सभागृहातील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग सामाजिक, राजकीय  मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यांत करोना वायरसचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement

Advertisement

Leave a Reply